शुक्रवार, २२ एप्रिल, २०२२

माझा गाव पाटणे

प्रास्तविक - 

एक खेडेगाव . नाशिक जिल्हा तालुका मालेगाव . राष्ट्रीय महामार्ग तीन च्या पश्चिमेस दीड मीटर अंतरावर . उत्तर अक्षांश २०. ५३ ; पूर्व रेखांश ७४. ४४ . पिवोड - ४२३२०१ . पूर्वेस   टेहरे ; मालेगाव कौळाणे. पश्चिमेस लहान आघार ;दक्षिणेस मुंगसे आणि उत्तरेस दाभाडी बारा बलुतेदार व अठरा पगड जाती . फुल माळी समाजाचे प्राबल्य ..मराठा ;  कोळी ; साळी ;धोबी ; भिल; हरिजन.; मातंग ;वडार सुतार; लोहार ; ब्राम्हण ;तेली ;न्हावी ;बेलदार ;कुणबी ;कोकणी ; राजपूत ; मारवाडी ;कासार ;गोसावी ; शिंपी ; गोंधळी ;रंगारी ; सर्व समाज गुण्या गोविंदाने राहतात 

      मालेगाव तालुक्यातील मातब्बर गावांपैकी एक .यास बंगाली पाटणे असे ही म्हणतात .झाडू माळ्याचे पाटणे  अशी ही ओळख . झाडू माळी व बाळू माळी गुराखी मित्र . साऱ्या गावातील गाई ,म्हशी गावाच्या पूर्वेस गणपती मंदिर समोर एकत्र व्हायच्या. त्यांना दुपार पर्यंत चारून दुपारी विश्रांती साठी पाटावर घेऊन येत . गुरे विश्रांती घेत व दोघे मित्र आपल्या भाकरी खात असत .एके दिवशी असेच जेवण करीत असताना   डोंबारीची पाल तेथे उतरली.त्यांची घोडी,कोंबड्या ,काही शेळ्या , बाई मानस , पोर ,पोरी आणि खेळाचे साहित्य दिसत होते, बहुधा उद्या ते गावात खेळ करणार हे नक्की .

 आणि पुढचे दोन दिवस त्यांनी कसरतीचे खेळ गांधी चौकात ,पटांगण गल्लीत,आणि कोंबड गल्लीत केलेत आणि शेवटी जादूचे खेळ गावातील मांत्रिक ,जादूगार याना आवाहन देऊन केले. सारे गावकरी मंत्रमुग्ध झालेत."दोन-चार दिवस सारे ग्रामस्थ मिटक्या मारीत त्याच गोष्टी  चघळत राहिले .त्या नंतर च्या दुसऱ्या दिवशी रान फिरवून दुपारी पाणवठ्यावर जेव्हा दोघे मित्र आले तर  सूनसुनाट .डोंबारी  परागंदा . भाकरी सोडून जेवायला बसणार इतक्यात आवाज ,दोन घास माला भी दया. असा आवाज आला.झाडू व बाळू जवळ गेले  जेवण दिले,त्याच आजीने त्यांना स्वतःच्या मुलांना न दिलेली विद्या देऊन कसे  पारंगत केले , वगैरे कथा सांगतात.मांत्रिक,जादूगर,आज ही त्यांना नमन करून च कार्यक्रम करतात . आज शिवेवर उभारलेल्या स्वागत कमानीवर ग्रामदैवत म्हणून त्यांचे नाव टाकून ग्राम पंचायतिने आदर व्यक्त केला आहे.

                 स्वातंत्र्य संग्रामात कै .कौतिक गंगाराम पगारे,माधवराव वाघ.कृष्णाजी पेठे,पंडित चिमन ,प्रल्हाद भिकाजी यांनी सहभाग घेऊन आपली नांवे कायमची कोरून ठेवली .दुसऱ्या जागतिक युद्धात काही जवानांनी  ब्रिटिश शासनास मदत केली .पाटणे गावांत सन १९५२-१९५३ मध्ये ग्राम पंचायत आली.शेतकरी बांधवा साठी सहकारी सोसायटी   आली.कै. लक्ष्मण दशरथ आहिरे २७ वर्ष चेअरमन म्हणून राहिले.

     

    

   

 

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा