केदारनाथ -बद्रिनाथ यात्रा दिनांक -२०/०५/२०००. जवळ जवळ १२ महिन्या पासून केदारनाथ -बद्रिनाथ यात्रा करण्याचा संकल्प सोडलेला होता. तो आज दिनांक २०./०५/२०००रोजी सिद्धिस जात आहे. अस्मादिक ;कुटुंब ;दोन्ही जावाई ;दोन्ही मुली व ७ नातू यांसाठी १ ट्रक्स व रामचंद्र बापू ;कुटुंबिय व मित्र परिवारासाठी एक मार्शल अशा दोन गाड्यांनी दिनांक २१/०५/२००० रोजी पहाटे देवाचे नाव घेऊन आम्ही केदारनाथ =बद्रीनाथ यात्रे करिता कूच केले. अशी झाली आमची यात्रा सुरू .
हिमालयाच्या पर्वत रांगा ;त्याची गगनचुंबी शिखरे ;गंगा ;यमुना सारख्या बारमाही वहाणा-या नद्या ;चंबळेचे खोरे ;इंद्रप्रस्थ ;इंदोर ;भोपाळ ;मथुरा ;वृंदावन सारखी अशी कितीतरी भौगोलिक व ऐतिहासिक आणि पौराणिक सुध्दा शहरे आपण पहाणार या भावनेने मन मोहरून गेले होते तर दुर्गम पहाडी प्रदेश; राजमार्गावर होणारे अपघात;कोसळणारे कडे;ठप्प होणारी वहातूक; प्रवाशांची होणारी कोंडी द-यात कोसळणा-या प्रवासी गाड्या आणि आपण तर सारे कुटुंबच घेऊन निघालो . त्यातून मनाला हुलकावणारी भीती त्यातून अंतकरणात होणारी घालमेल;मनाला वेदना देऊन जात होती . पण कोठेतरी स्वामी समर्थांचे वाक्ये भिऊ नकोस मी तुझ्या पाठीसी आहे प्रवासाला धिट व निर्भय बनवीत होते. पहिल्याच दिवसी प्रत्येकाला वाटणारी हुरहूर ;गप्पा-गाणी ;प्रवास ;घर प्रपंच ;याच्या चिंता यातच आमचा प्रवास सुरु झाला. मालेगाव गेले; धुळे गेले व शिरपूर ही गेले आणि महाराष्ट्राला बाय बाय केले. आपले राज्य गेले मध्य प्रदेश भारताच्या नकाशा वरील सर्वात मोठा भूभाग व्यापणारे राज्य क्षिप्रा ; चंबळा;नर्मदा;तापी ;सारख्या नद्द्याची खोरी .इन्दोर ;उज्जैन मांडवगड;महू ;भोपाळ कितीतरी अशी शहरे व नगरे यांच्या सीमा आपण स्पर्शून जाणार ही कल्पनाच मनाला रोमाचिंत करीत होती . इतक्यात बिजासनी देवीचे मंदिर आले. धनवटांची ही कुलदेवी श्रीफळ चढउन देवीचे दर्शन घेतले . त्या नंतर आले सेंधवा .नर्मदा आली व धामनोर येथे आम्ही चहापान घेतला.धामनोरहून महूला पोहचलो .महू म्हणजे भारतीय घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर यांचे जन्म स्थळ विशेष म्हणजे राष्टीय राज मार्ग -३ महू गावातून तर जातोच आणि तो ही बाबासाहेबांच्या जन्म स्थळाला स्पर्श करूनच . जणू त्याना वंदन करूनच. त्या महा मानवाला आम्ही ही प्रणाम केला.
दुपारी २ पर्येंत आम्ही इंदोर ला पोहचलो. इतक्यात मार्शलला ट्राफिक पोलिसांनी घेरलेले. कशी तरी तोडी करून आम्ही पुढचा रस्ता धरला. पुढे आले देवास . नंतर जैताबाद; शाजापूर; सारंगपूर करीत रात्री ९. ३० वाजता ब्यावरा ह्या तहसिल ला पोहचलो. तेथील मेडतवाल धर्मशाळेत मुक्काम केला . धर्मशाळा सर्व सुख सोयीने युक्त होती . रात्री जेवणे करून दिवसभराच्या थकव्याने सारे झोपेच्या स्वाधीन झाले.
आज २२ मे २०००;प्रात:काळी सर्व जागे झाले व आपआपल्या परीने तयारीला लागले . .चहा;नाश्ता घेऊन ८ वाजता आम्ही ब्यावरा सोडले. पुढे बिनागंज ;आवन ;विजयापूर.सठियाई;गुणा ;बदखाघक़ालीरस व शेवटी शिवपुरी येथे दुपारी २ वाजता पोहचलो. उष्मा मी म्हणत होता. गुणा आणि शिवपुरी म्हणजे दस्युरानी पुतळा हिच्या कुप्रसिद्द लिलांनी ओळखला जाणारा प्रदेश . हजारो किलो मिटर पसरलेली घनदाट जंगले ;भिल्लाची साम्राज्ये ;हे सारे आठउन अंगावर भीतीचा काटा उभा राही. शिवपुरीला जेवण घेऊन सांयकाळ पर्यत ग्वाल्हेर गाठणे हेच बरे म्हणूं लवकर निघालो. आता जंगल प्रवास सुरू झाला . पण जसे ऐकले होते तसे काही ही आढळले नाही. दुतर्फा बरीच जंगल तोड झालेली . २५ ते ५० किलोमीटरच्या अंतरावर ढाबे सजलेली त्यामुळे आता दिवसाच काय पण रात्री सुद्दा बिनधास्त प्रवास करता येईल इतक्या सुधारणा झालेल्या . दरोडेखोरांचा जवळ जवळ निपात झालेला. बरीचशी जमीन शेतीखाली आलेली. व्यापार ही वृद्धिंगत झालेला . फरसीच्या खाणीच खाणी. जिकडे पहावे तिकडे जणू फरसिचीच. शेती की काय.शेती मात्र मागासलेली. उघडया विहिरी नाहीत. बॉरिंगच्या विहिरी मात्र अंतरा अंतरावर दिसत होत्या. उत्तर भारताकडे जसे वर वर जावे तसा तसे उष्णतामान मात्र वाढत जाते. उष्माघातामुळे माणसे मेल्याच्या बातम्या ज्या आपण वर्तमानपत्रातून वाचत होतो त्याची प्रचिती जानवते. अधून मधून जनावरे मरून पडलेली दिसत होती. ती उश्माघातामुळेच .
सांयकाळी ४ वाजता अम्ही एकदाचे ग्वाल्हेर गाठले तेथे वेळ न दवडता प्रवास चालूच ठेवला .मुरैना येथे मध्य प्रदेश ची सरहद्द संपली.आता राजस्थान सीमा आमचे स्वागत करीत होती. एका राज्यातून दुस-या राज्यात प्रवेश करताना मनाला एक अनामिक जाणिव होते.आपल्या प्रदेशां पासून जसजसे आपण दुरावतो तसतसे ही अनामिक जाणिव भीति ;हुरहूर व रोमांच भावनांनी मनाला व्यापून टाकते. आता आग्रा आले होते. एका धर्मशाळेत मुक्काम. प्रेमनगरी आग्रा . ताजमहाल शहाजन्हा व मुमताज याच्या प्रेमाचे अप्रतिम प्रतिक. जग प्रसिद्द ताजमहल च्या प्रांगनात आपण पहुडलो आहोत ही भावना मनाला गद्गगदित होती. दुस-या बाजूला यमुनेचे ते गलिच्छ पात्र; प्रवाशांना लुबाडणारे शहर हेच का ते आग्रा ? आज सकाळी ६ वाजता आवराआवर करून ताजमहाल पहाण्यासाठी आम्ही बाहेर पडलो. प्रवेश द्वारात अनेक देशी विदेशी तो स्वर्गतुल्य ताज पहाण्यासाठी उत्सुक होते . तिकीटे काढून रांगा लावित होते . एकदाचा आम्ही ताजच्या त्या विस्तीर्ण प्रांगणात प्रवेश केला . भव्य व दिव्य ताजचे ते विलोभिनिय रूप पाहून मोगलाचा सारा इतिहास तरूळून गेला थुई थुई नाचणारी कारंजी . आकाशाला भिडणारे मिनार आणि ताजला स्पर्शून जाणारी यमुना सारे मंत्रमुग्ध करणारेच अंत करणात आणि डोळ्यात कसे साठवणार फोटो च फोटो . शरीर व मन ही थकले पण पाउले काही बाहेर पडे नात . प्रेमी जगताला भूषनावह ;गरिबांना असूया उत्पन्न करणारा व कवी मनाला भुरळ पाडणा-या वास्तूतून अखेर आम्ही बाहेर पडलों आता आम्ही आग्रा किल्ल्याकडे मोर्चा वळविला. मोगलांच्या विशाल साम्राज्याची व कठोर शिस्तीची कल्पना आग्रा किल्याचे विशाल प्रवेश दार पाहून येते. आग्रा किल्याचा बराचसा भाग संरक्षण खात्याच्या अधिपत्या खाली असल्याने पुर्ण किल्ला काही पहाता येत नाही . किल्ल्याचे ते विशाल स्वरूप पाहून शिवबांनी आग-याहून कशी सुटका करून घेतली असेल ? असे प्रश्न तर येतातच परंतु शिवबाची मर्दुमुखी व शौर्य ही आपल्या मनाला मोहरून टाकते . उगीचच नाही मोगलांना पळता भुई थोडी झाली होती. दुपारी १ वाजता आम्ही आग्रा सोडले व मथुरेकडे प्रयाण केले. तीन वाजता आम्ही कंसाच्या नगरीत प्रवेश केला मथुरा म्हणताच वासुदेव देवकी ; उग्रसेन; कृष्णाचे जन्म स्थळ अशा कितीतरी कथा डोळ्यासमोरून तरळून जाऊ लागल्या. त्या नंतर आम्ही गोकुळात गेलो. येथे अजुनही गाईचे संवर्धन होते. दुध व दही विपुल प्रमाणात उपलब्ध होते. त्याचा येथेच्छ स्वाद घेऊन आम्ही वृदां वनात आलो. वृदांवनात रासलीला व इतर पौराणिक कथांना अनुरूप अनेक ठिकाणे पहावयास मिळतात. येथील श्रीकृष्णाचे मंदिर अप्रतिम आहे. आता आम्ही दिल्ली कडे निघालों रात्री १० वाजता आम्ही दिल्लीला पोहचलो. आमची गाडी इतिहास प्रसिद्द लाल किल्ल्यासमोर उभी होती . दिल्ली हळू हळू निद्राधीन होत होती. लाल किल्ल्या समोरील त्या विस्तीर्ण मैदानात सर्वत्र टुरिस्ट गाड्यांच उभ्या होत्या निवासाची सोय होणे शक्य नाही हे आमच्या लक्षात आले आम्ही पुढे चालत रहाण्याचा निर्णय घेतला रात्री ११ वाजता आम्ही दिल्लीला बाय बाय केले. पुढे गाझियाबाद जवळ आल्यावर रस्त्याच्या कडेला ब-याचशा टुरिस्ट गाड्या पाहून आम्ही ही तेथेच रात्र काढावयाचा निर्णय घेतला. एव्हाना चालक जेवणा साठी बाहेर पडलेले तर इतर बिछाने टाकून झोपावयास गेलेले. डासांचा उच्छाद असून ही दिवस भराच्या शिनवट्याने आक़्मचे डोळे आपोआप बंद झाले. शेवटी २४ मे उजाडला. सर्व खडबडून जागे झाले . प्रातविधी आटोपून सर्व प्रवासास सिध्द झाले. गाझियाबादला चहा घेतला. पुढे मोतीनगर;मोदीपुरम ;सकोती;मुझ्झपरनगर ;रूडकी;वहादराबाद मार्गे हरद्वार कडे आम्ही जात राहिलो. हरद्वार ५० किलोमीटरवर असेल तितक्यात एका विहिरीवरील बोरींग चे पाणी पाहून सर्वानी स्नानाची तयारी केली . मार्शल मात्र पुढे निघून गेली . गाझियाबाद हून
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा