मंगळवार, २९ नोव्हेंबर, २०२२
वैतरणा सहल पाटणे ज्येष्ठ नागरिक मित्र मंडळ . दिनांक -- १३ नोव्हेम्बर २०२२. रविवार .
शुक्रवार, २२ एप्रिल, २०२२
माझा गाव पाटणे
प्रास्तविक -
एक खेडेगाव . नाशिक जिल्हा तालुका मालेगाव . राष्ट्रीय महामार्ग तीन च्या पश्चिमेस दीड मीटर अंतरावर . उत्तर अक्षांश २०. ५३ ; पूर्व रेखांश ७४. ४४ . पिवोड - ४२३२०१ . पूर्वेस टेहरे ; मालेगाव कौळाणे. पश्चिमेस लहान आघार ;दक्षिणेस मुंगसे आणि उत्तरेस दाभाडी बारा बलुतेदार व अठरा पगड जाती . फुल माळी समाजाचे प्राबल्य ..मराठा ; कोळी ; साळी ;धोबी ; भिल; हरिजन.; मातंग ;वडार सुतार; लोहार ; ब्राम्हण ;तेली ;न्हावी ;बेलदार ;कुणबी ;कोकणी ; राजपूत ; मारवाडी ;कासार ;गोसावी ; शिंपी ; गोंधळी ;रंगारी ; सर्व समाज गुण्या गोविंदाने राहतात
मालेगाव तालुक्यातील मातब्बर गावांपैकी एक .यास बंगाली पाटणे असे ही म्हणतात .झाडू माळ्याचे पाटणे अशी ही ओळख . झाडू माळी व बाळू माळी गुराखी मित्र . साऱ्या गावातील गाई ,म्हशी गावाच्या पूर्वेस गणपती मंदिर समोर एकत्र व्हायच्या. त्यांना दुपार पर्यंत चारून दुपारी विश्रांती साठी पाटावर घेऊन येत . गुरे विश्रांती घेत व दोघे मित्र आपल्या भाकरी खात असत .एके दिवशी असेच जेवण करीत असताना डोंबारीची पाल तेथे उतरली.त्यांची घोडी,कोंबड्या ,काही शेळ्या , बाई मानस , पोर ,पोरी आणि खेळाचे साहित्य दिसत होते, बहुधा उद्या ते गावात खेळ करणार हे नक्की .
आणि पुढचे दोन दिवस त्यांनी कसरतीचे खेळ गांधी चौकात ,पटांगण गल्लीत,आणि कोंबड गल्लीत केलेत आणि शेवटी जादूचे खेळ गावातील मांत्रिक ,जादूगार याना आवाहन देऊन केले. सारे गावकरी मंत्रमुग्ध झालेत."दोन-चार दिवस सारे ग्रामस्थ मिटक्या मारीत त्याच गोष्टी चघळत राहिले .त्या नंतर च्या दुसऱ्या दिवशी रान फिरवून दुपारी पाणवठ्यावर जेव्हा दोघे मित्र आले तर सूनसुनाट .डोंबारी परागंदा . भाकरी सोडून जेवायला बसणार इतक्यात आवाज ,दोन घास माला भी दया. असा आवाज आला.झाडू व बाळू जवळ गेले जेवण दिले,त्याच आजीने त्यांना स्वतःच्या मुलांना न दिलेली विद्या देऊन कसे पारंगत केले , वगैरे कथा सांगतात.मांत्रिक,जादूगर,आज ही त्यांना नमन करून च कार्यक्रम करतात . आज शिवेवर उभारलेल्या स्वागत कमानीवर ग्रामदैवत म्हणून त्यांचे नाव टाकून ग्राम पंचायतिने आदर व्यक्त केला आहे.
स्वातंत्र्य संग्रामात कै .कौतिक गंगाराम पगारे,माधवराव वाघ.कृष्णाजी पेठे,पंडित चिमन ,प्रल्हाद भिकाजी यांनी सहभाग घेऊन आपली नांवे कायमची कोरून ठेवली .दुसऱ्या जागतिक युद्धात काही जवानांनी ब्रिटिश शासनास मदत केली .पाटणे गावांत सन १९५२-१९५३ मध्ये ग्राम पंचायत आली.शेतकरी बांधवा साठी सहकारी सोसायटी आली.कै. लक्ष्मण दशरथ आहिरे २७ वर्ष चेअरमन म्हणून राहिले.
गुरुवार, २१ एप्रिल, २०२२
केदारनाथ -बद्रिनाथ यात्रा
केदारनाथ -बद्रिनाथ यात्रा दिनांक -२०/०५/२०००. जवळ जवळ १२ महिन्या पासून केदारनाथ -बद्रिनाथ यात्रा करण्याचा संकल्प सोडलेला होता. तो आज दिनांक २०./०५/२०००रोजी सिद्धिस जात आहे. अस्मादिक ;कुटुंब ;दोन्ही जावाई ;दोन्ही मुली व ७ नातू यांसाठी १ ट्रक्स व रामचंद्र बापू ;कुटुंबिय व मित्र परिवारासाठी एक मार्शल अशा दोन गाड्यांनी दिनांक २१/०५/२००० रोजी पहाटे देवाचे नाव घेऊन आम्ही केदारनाथ =बद्रीनाथ यात्रे करिता कूच केले. अशी झाली आमची यात्रा सुरू .
हिमालयाच्या पर्वत रांगा ;त्याची गगनचुंबी शिखरे ;गंगा ;यमुना सारख्या बारमाही वहाणा-या नद्या ;चंबळेचे खोरे ;इंद्रप्रस्थ ;इंदोर ;भोपाळ ;मथुरा ;वृंदावन सारखी अशी कितीतरी भौगोलिक व ऐतिहासिक आणि पौराणिक सुध्दा शहरे आपण पहाणार या भावनेने मन मोहरून गेले होते तर दुर्गम पहाडी प्रदेश; राजमार्गावर होणारे अपघात;कोसळणारे कडे;ठप्प होणारी वहातूक; प्रवाशांची होणारी कोंडी द-यात कोसळणा-या प्रवासी गाड्या आणि आपण तर सारे कुटुंबच घेऊन निघालो . त्यातून मनाला हुलकावणारी भीती त्यातून अंतकरणात होणारी घालमेल;मनाला वेदना देऊन जात होती . पण कोठेतरी स्वामी समर्थांचे वाक्ये भिऊ नकोस मी तुझ्या पाठीसी आहे प्रवासाला धिट व निर्भय बनवीत होते. पहिल्याच दिवसी प्रत्येकाला वाटणारी हुरहूर ;गप्पा-गाणी ;प्रवास ;घर प्रपंच ;याच्या चिंता यातच आमचा प्रवास सुरु झाला. मालेगाव गेले; धुळे गेले व शिरपूर ही गेले आणि महाराष्ट्राला बाय बाय केले. आपले राज्य गेले मध्य प्रदेश भारताच्या नकाशा वरील सर्वात मोठा भूभाग व्यापणारे राज्य क्षिप्रा ; चंबळा;नर्मदा;तापी ;सारख्या नद्द्याची खोरी .इन्दोर ;उज्जैन मांडवगड;महू ;भोपाळ कितीतरी अशी शहरे व नगरे यांच्या सीमा आपण स्पर्शून जाणार ही कल्पनाच मनाला रोमाचिंत करीत होती . इतक्यात बिजासनी देवीचे मंदिर आले. धनवटांची ही कुलदेवी श्रीफळ चढउन देवीचे दर्शन घेतले . त्या नंतर आले सेंधवा .नर्मदा आली व धामनोर येथे आम्ही चहापान घेतला.धामनोरहून महूला पोहचलो .महू म्हणजे भारतीय घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर यांचे जन्म स्थळ विशेष म्हणजे राष्टीय राज मार्ग -३ महू गावातून तर जातोच आणि तो ही बाबासाहेबांच्या जन्म स्थळाला स्पर्श करूनच . जणू त्याना वंदन करूनच. त्या महा मानवाला आम्ही ही प्रणाम केला.
दुपारी २ पर्येंत आम्ही इंदोर ला पोहचलो. इतक्यात मार्शलला ट्राफिक पोलिसांनी घेरलेले. कशी तरी तोडी करून आम्ही पुढचा रस्ता धरला. पुढे आले देवास . नंतर जैताबाद; शाजापूर; सारंगपूर करीत रात्री ९. ३० वाजता ब्यावरा ह्या तहसिल ला पोहचलो. तेथील मेडतवाल धर्मशाळेत मुक्काम केला . धर्मशाळा सर्व सुख सोयीने युक्त होती . रात्री जेवणे करून दिवसभराच्या थकव्याने सारे झोपेच्या स्वाधीन झाले.
आज २२ मे २०००;प्रात:काळी सर्व जागे झाले व आपआपल्या परीने तयारीला लागले . .चहा;नाश्ता घेऊन ८ वाजता आम्ही ब्यावरा सोडले. पुढे बिनागंज ;आवन ;विजयापूर.सठियाई;गुणा ;बदखाघक़ालीरस व शेवटी शिवपुरी येथे दुपारी २ वाजता पोहचलो. उष्मा मी म्हणत होता. गुणा आणि शिवपुरी म्हणजे दस्युरानी पुतळा हिच्या कुप्रसिद्द लिलांनी ओळखला जाणारा प्रदेश . हजारो किलो मिटर पसरलेली घनदाट जंगले ;भिल्लाची साम्राज्ये ;हे सारे आठउन अंगावर भीतीचा काटा उभा राही. शिवपुरीला जेवण घेऊन सांयकाळ पर्यत ग्वाल्हेर गाठणे हेच बरे म्हणूं लवकर निघालो. आता जंगल प्रवास सुरू झाला . पण जसे ऐकले होते तसे काही ही आढळले नाही. दुतर्फा बरीच जंगल तोड झालेली . २५ ते ५० किलोमीटरच्या अंतरावर ढाबे सजलेली त्यामुळे आता दिवसाच काय पण रात्री सुद्दा बिनधास्त प्रवास करता येईल इतक्या सुधारणा झालेल्या . दरोडेखोरांचा जवळ जवळ निपात झालेला. बरीचशी जमीन शेतीखाली आलेली. व्यापार ही वृद्धिंगत झालेला . फरसीच्या खाणीच खाणी. जिकडे पहावे तिकडे जणू फरसिचीच. शेती की काय.शेती मात्र मागासलेली. उघडया विहिरी नाहीत. बॉरिंगच्या विहिरी मात्र अंतरा अंतरावर दिसत होत्या. उत्तर भारताकडे जसे वर वर जावे तसा तसे उष्णतामान मात्र वाढत जाते. उष्माघातामुळे माणसे मेल्याच्या बातम्या ज्या आपण वर्तमानपत्रातून वाचत होतो त्याची प्रचिती जानवते. अधून मधून जनावरे मरून पडलेली दिसत होती. ती उश्माघातामुळेच .

