आमचे बाबा -माझे मनोगत .
आमचे बाबा -माझे मनोगत . सौ . प्रमिला वैभव आहिरे . [ B.A]
दिनांक - ११ जानेवारी २०२३ -------------------------------------------------------------------------
त्यांना बारमाही फुले असतात. नक्कीच आज काहीतरी कार्यक्रम असणार . बाबाची लगबग पाहून मनात विचार आला --कोणत्याही सार्वजनिक अथवा सामाजिक कार्यक्रमात गुलाबाचा सुगंध दरवळला कि समजावे , बाबा कार्यक्रमाला चालले आहेत. सरांच्या घरी अनेक फुलझाडे आहेत. त्यांना बारमाही फुले असतात . एका छोट्या पिशवीत ती फुले घेऊन बाबा कार्यक्रमाला जातात .गेल्या तीन चार वर्षा पासून बाबाचा नित्य पाठ आहे. गेल्या गेल्या सर्व ज्येष्ठ नागरिकांना ती फुल वाटतात .सगळ्याची मन प्रसन्नतेने भरून जातात. अपार दुःखात गांजलेले .अंगमेहनती,कष्टकरी कोणाच्याही मदतीला पटकन तयार असणारे बाबा कधी ही पाहावे तर सुगंध वाटत फि रणारे बाबा सदा प्रसन्न असतात. सगळ्य्याची दुःखे पचऊन त्यांना न्याय मिळवून देत असतात. गत ८५ वर्षे लढणारा हा योद्धा आज ही थकलेला नाही. काय रसायन आहे या माणसा मध्ये ?
आता आपण एवढे ज्या माणसा बद्दल बोलत आहोत त्या माणसाचे नाव सांगायलाच मी विसरले !. त्याच नाव आहे बाबुलाल केदू आहिरे पण त्यांना या नावाने कोणीच ओळखत नाही. बरं का ! त्यांना सारे बी.के . सर या नावाने मात्र पटकन ओळखतात. बाबानी अनेक सार्वजनिक कामांना पुढाकार घेऊन मार्गी लावलेले आहे. मी त्याची नातसून आहे पण बाबाना पितृतुल्य मानते.
बाबा नेहमी आम्हाला त्याच्या मुलां प्रमाणे मानतात. त्यामुळे ते नेहमी आमच्या स्वभाव-दोषाकडे ,आमच्या खोडकरपणाकडे दुर्लक्ष करतात. अतिशय शिस्तप्रिय व्यक्तिमत्व अशी त्यांची ओळख.अनेक संस्था उभारणीत त्यांचा हातभार लागलेला पण कोठे ही त्यांनी आपल्या पाऊल खुणा ठेवल्या नाहीत. स्वभावाने कठोर तरी आजी शी अतिशय प्रेमळ. आयुष्यमाजी जीवन साथी कसे असावेत त्याचे आदर्श उदाहरण आजी व बाबा .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा