शुक्रवार, २२ सप्टेंबर, २०२३

आमचे बाबा -माझे मनोगत .

        आमचे बाबा -माझे मनोगत .  सौ . प्रमिला वैभव आहिरे .  [ B.A]

      दिनांक - ११ जानेवारी २०२३ -------------------------------------------------------------------------

             त्यांना बारमाही फुले असतात.    नक्कीच आज काहीतरी कार्यक्रम असणार . बाबाची लगबग  पाहून मनात विचार आला --कोणत्याही सार्वजनिक अथवा सामाजिक कार्यक्रमात  गुलाबाचा सुगंध दरवळला  कि समजावे , बाबा कार्यक्रमाला  चालले आहेत.   सरांच्या  घरी अनेक फुलझाडे आहेत. त्यांना बारमाही फुले असतात .  एका छोट्या पिशवीत ती फुले घेऊन बाबा कार्यक्रमाला जातात .गेल्या तीन चार वर्षा पासून  बाबाचा नित्य पाठ आहे.  गेल्या गेल्या सर्व ज्येष्ठ नागरिकांना ती फुल वाटतात .सगळ्याची मन प्रसन्नतेने भरून जातात.  अपार  दुःखात  गांजलेले .अंगमेहनती,कष्टकरी  कोणाच्याही मदतीला पटकन तयार असणारे बाबा  कधी ही पाहावे तर सुगंध वाटत  फि रणारे बाबा सदा प्रसन्न असतात.  सगळ्य्याची दुःखे पचऊन   त्यांना न्याय मिळवून देत असतात. गत  ८५ वर्षे  लढणारा हा योद्धा  आज ही  थकलेला नाही.  काय रसायन आहे या माणसा मध्ये ?

                         आता आपण एवढे  ज्या माणसा बद्दल  बोलत आहोत त्या माणसाचे नाव सांगायलाच मी विसरले !. त्याच नाव आहे  बाबुलाल  केदू  आहिरे  पण त्यांना या नावाने कोणीच ओळखत नाही. बरं  का ! त्यांना सारे बी.के . सर या नावाने मात्र पटकन ओळखतात.  बाबानी अनेक सार्वजनिक कामांना पुढाकार घेऊन मार्गी लावलेले आहे.  मी त्याची नातसून आहे पण बाबाना पितृतुल्य मानते.  

          बाबा  नेहमी आम्हाला त्याच्या   मुलां  प्रमाणे मानतात.  त्यामुळे ते  नेहमी आमच्या  स्वभाव-दोषाकडे ,आमच्या खोडकरपणाकडे दुर्लक्ष  करतात. अतिशय शिस्तप्रिय व्यक्तिमत्व अशी त्यांची ओळख.अनेक संस्था उभारणीत त्यांचा हातभार लागलेला पण कोठे ही त्यांनी आपल्या पाऊल खुणा ठेवल्या नाहीत. स्वभावाने कठोर तरी आजी शी अतिशय प्रेमळ. आयुष्यमाजी जीवन साथी कसे असावेत त्याचे आदर्श उदाहरण आजी व बाबा .

मंगळवार, १७ जानेवारी, २०२३

ज्येष्ठ नागरिक मित्र मंडळ पाटणे

  मासिक सहल -श्रीक्षेत्र  भीमाशंकर  शिरपूर वाडे 

             ता. बागलाण  जि .नाशिक   बुधवार .दिनांक -११/०१/२०२३
                                                                                                                                                                                                                            नेहमीच्या धकाधकीच्या  जीवनात  अनेक चांगले व  वाईट प्रसंग येत असतात .तसे जातात सुद्धा , नाही बसून राहात .  असेच एके दिवशी सहज आम्ही ज्येष्ठ नागरिक गप्पा मारीत  असताना मंडळाचे सहल प्रमुख श्री मोतीलाल बागुल म्हणाले . कधी काढायची मासिक सहल ? तेव्हा मी म्हणालो , असं करा  ना  आपले मंडळाचे  उपाध्यक्ष श्री भिला सोनू खैरनार यांचा ८७ वा वाढदिवस ११ जानेवारी स  येत आहे  . तेव्हा त्याच दिवशी आपली सहल ही  होईल  अन वाढदिवस  सुद्धा  साजरा करता येईल .  आपण गाणी म्हणू , अभंग म्हणू , त्यांच्या जीवनावर भाषणे करू  या . 

                             सर्व म्हणाले done .  बस लोकेशन  अध्यक्षांनी ठरवावे . एका  गोष्टीचे भान  मात्र असू द्यावे , सहल सायंकाळ पर्यंत संपावी आणि रात्र संपण्यापूर्वीच घरी परतायला हवे . 

                                 दुसर-या  दिवशी अध्यक्षांनी  लोकेशन बागलाण तालुक्यातील शिरपूर वडे येथील श्रीक्षेत्र भीमाशंकर  येथे जाण्याचा निर्णय जाहीर केला . शिक्कामोर्तब झाले . 

                                  बुधवार  दिनांक ११ जानेवारीस ठरल्या प्रमाणे सकाळी  ८ वाजता  पाटणे  ज्येष्ठ नागरिक मंडळाचे १३ सदस्य नियोजित  क्रुझर बस ने  सहलीला  निघाले. 

                                  बस नामपुर  येताच थांबली .  चालक  -मालक श्री   अमोल  आहिरे यांनी काही खरेदी करावयाची   असल्यास  येथे करून घ्या. कारण पुढील प्रदेश डोंगराळ आणि ग्रामीण आहे , मोठे गाव पुढे नाही .  मग सर्वानी श्रीफळ ,हार, गुच्छ घेतले  व गाडी  पुढे धावू लागली , नामपूर बागलाण तालुक्यातील चांगली बाजारपेठ . येथील  कै .जयवंत सावंत बागलाण च नव्हे तर मालेगाव तालुक्यातील सुद्धा नावारूपास आलेले व्यक्तिमत्व .  नामपूर  इतिहास ,भूगोल शिवाय त्याच्या  अपूर्णच . नामपूर मोक्षगंगेच्या उजव्या तीरावर ,  बागलाण आणि खान्देश या दोन्ही भावंडांना सांभाळणारे ते नामपूरच . मोसमचे खोरे व  धनदायी , चिराइ , म्हाळसाई , नागाई , ,धनाई ,पुनाई  या भगिनीं  चे  प्रवेशद्वार  नामपूर च . 

                             नामपूर सोडताच मोसम चा पूल  ही  गेला.  साक्री  रोड ही  मागे पडला , आता  दुतर्फ़ा  बागा डाळिंबाच्या ,द्राक्षांच्या  ,या शिवाय उसाचे  मळे   आणि  शेतक-यांना  रडविणारा - हसविणारा  कांदा मात्र बेसुमार क्षेत्र  अंगा खाली घेत होता . पहिले गाव आले खामलोन . प्रगतीशील व संपन्न गाव

खामलोन गेले  तरी कांदे लागवड संपता- संपेना  साहजिकच मनात विचारांची शृंखला  सुरु झाली.  कसे होणार ? शेतकरी बांधवांचे ? एवढी कांदे लागवड !येणारे बम्पर उत्पन्न  ? कांदा    म्हणजे जेवण नव्हे . फक्त तोंडी लावण्या पुरते . मागणी नसली कि भाव पडतात . भाव पडले कि लागवड खर्च वसूल  होत नाही . कर्जे फिटत नाहीत.  कर्जाचे तगादे सुरु होतात . सावकार व बँका  घरातली भांडी काढणार , अब्रू चव्हाट्यावर येणार शेतकरी आत्महत्त्या करणार.कसे होणार बाली राजाचे ?मनातील  प्रश्नांची मालिका अखंडित होईच  ना. उत्राणे  गाव  आले आणि गेले तरी थांगपत्ता  नाही लागला .. 

                  पण  तो वर गाडी  थांबलेली .उतरा! उतरा !  ! आणि  अर्ध्या तासापासून बसलेले पण थकलेले खाली उतरले. हात पाय झाडून मोकळे झाले. परिसर न्याहाळू लागले .सुंदर ! फारच छान ! मंदिर परिसर  स्वच्छ ,प्रेक्षणीय तर होताच परंतु सर्वसोयीयुक्त सुध्दा वाटला.परिसर पहाता पहाता मंदिराकडे जाऊन दर्शन घेऊ या ! म्हणून दर्शन घेतले.

                    दर्शांन घेऊन  सारे बाहेर आले. आता उपाध्यक्ष श्री भिला सोनू  खैरनार याचा ८७ वा वाढदिवस साजरा करणेसाठी सर्व बसले . अध्यक्ष यांनी प्रास्ताविक करून हार,श्रीफळ ,उपरणे ,टोपी व स्वेटर देऊन सत्कार केला.शुभेच्छा दिल्या. आळीपाळीने सर्वानी सत्कार करून शुभेच्छा दिल्या.सौ. जयश्री आहिरे यांनी त्यांच्या जीवनावर माहिती विशद केली . शेवटी कोंडाजी बागूल यांनी आभार मानले . नंतर जेवणे करून आम्ही पुढे जानेसाठी बाहेर पडलो .

                             पुढे दोन तीन किलोमीटर वर टिंगरी म्हणून खेडेगाव लागले.रस्ताअरुंद पण डांबरी.वाहतूक  निरक .डोंगराळ प्रदेश .हिडबरी घाट असल्याचे कळले. आता आम्ही धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातून जात आहोत.घाटाच्या पायथ्याशी हिडीमबा देवीचे मंदिर दिसले .

    साक्री तालुक्यातील श्री गोपाल कृष्ण मंदिर साठी प्रसिद्ध असलेले प्रतापपुर हे प्रगत गाव लागले. गावात प्रवेश करताच स्टँड जवळ मंदिर असलेने सर्वानी कळत न कळत दर्शन घेतले . मंदिराचे प्रवेश दारातच नामफलक दृष्टीस पडतो. मंदिराची लोकप्रियता ,मान्यता समजते .

            या नंतर मात्र उभन्द्री ,शेवडीपाडा मार्गे पिंपळनेर-सटाणा महामार्ग पावदेव फाटा येथे येऊन कातरवेळ वरून जैन मंदिर मांगी--तुंगी गाठले.पर्वतारोहन टाळले व सटाणा मार्गे घरी येऊन सहली ची सांगता झाली .