शुक्रवार, २२ सप्टेंबर, २०२३

आमचे बाबा -माझे मनोगत .

        आमचे बाबा -माझे मनोगत .  सौ . प्रमिला वैभव आहिरे .  [ B.A]

      दिनांक - ११ जानेवारी २०२३ -------------------------------------------------------------------------

             त्यांना बारमाही फुले असतात.    नक्कीच आज काहीतरी कार्यक्रम असणार . बाबाची लगबग  पाहून मनात विचार आला --कोणत्याही सार्वजनिक अथवा सामाजिक कार्यक्रमात  गुलाबाचा सुगंध दरवळला  कि समजावे , बाबा कार्यक्रमाला  चालले आहेत.   सरांच्या  घरी अनेक फुलझाडे आहेत. त्यांना बारमाही फुले असतात .  एका छोट्या पिशवीत ती फुले घेऊन बाबा कार्यक्रमाला जातात .गेल्या तीन चार वर्षा पासून  बाबाचा नित्य पाठ आहे.  गेल्या गेल्या सर्व ज्येष्ठ नागरिकांना ती फुल वाटतात .सगळ्याची मन प्रसन्नतेने भरून जातात.  अपार  दुःखात  गांजलेले .अंगमेहनती,कष्टकरी  कोणाच्याही मदतीला पटकन तयार असणारे बाबा  कधी ही पाहावे तर सुगंध वाटत फरणारे बाबा सदा प्रसन्न असतात.  सगळ्य्याची दुःखे पचऊन   त्यांना न्याय मिळवून देत असतात. गत  ८५ वर्षे  लढणारा हा योद्धा  आज ही  थकलेला नाही.  काय रसायन आहे या माणसा मध्ये ?

                         आता आपण एवढे  ज्या माणसा बद्दल  बोलत आहोत त्या माणसाचे नाव सांगायलाच मी विसरले !. त्याच नाव आहे  बाबुलाल  केदू  आहिरे  पण त्यांना या नावाने कोणीच ओळखत नाही. बरं  का ! त्यांना सारे बी.के . सर या नावाने मात्र पटकन ओळखतात.  बाबानी अनेक सार्वजनिक कामांना पुढाकार घेऊन मार्गी लावलेले आहे.  मी त्याची नातसून आहे पण बाबाना पितृतुल्य मानते.  

          बाबा  नेहमी आम्हाला त्याच्या   मुलां  प्रमाणे मानतात.  त्यामुळे ते  नेहमी आमच्या  स्वभाव-दोषाकडे ,आमच्या खोडकरपणाकडे दुर्लक्ष  करतात

मंगळवार, १७ जानेवारी, २०२३

ज्येष्ठ नागरिक मित्र मंडळ पाटणे

  मासिक सहल -श्रीक्षेत्र  भीमाशंकर  शिरपूर वाडे 

             ता. बागलाण  जि .नाशिक   बुधवार .दिनांक -११/०१/२०२३
                                                                                                                                                                                                                            नेहमीच्या धकाधकीच्या  जीवनात  अनेक चांगले व  वाईट प्रसंग येत असतात .तसे जातात सुद्धा , नाही बसून राहात .  असेच एके दिवशी सहज आम्ही ज्येष्ठ नागरिक गप्पा मारीत  असताना मंडळाचे सहल प्रमुख श्री मोतीलाल बागुल म्हणाले . कधी काढायची मासिक सहल ? तेव्हा मी म्हणालो , असं करा  ना  आपले मंडळाचे  उपाध्यक्ष श्री भिला सोनू खैरनार यांचा ८७ वा वाढदिवस ११ जानेवारी स  येत आहे  . तेव्हा त्याच दिवशी आपली सहल ही  होईल  अन वाढदिवस  सुद्धा  साजरा करता येईल .  आपण गाणी म्हणू , अभंग म्हणू , त्यांच्या जीवनावर भाषणे करू  या . 

                             सर्व म्हणाले done .  बस लोकेशन  अध्यक्षांनी ठरवावे . एका  गोष्टीचे भान  मात्र असू द्यावे , सहल सायंकाळ पर्यंत संपावी आणि रात्र संपण्यापूर्वीच घरी परतायला हवे . 

                                 दुसर-या  दिवशी अध्यक्षांनी  लोकेशन बागलाण तालुक्यातील शिरपूर वडे येथील श्रीक्षेत्र भीमाशंकर  येथे जाण्याचा निर्णय जाहीर केला . शिक्कामोर्तब झाले . 

                                  बुधवार  दिनांक ११ जानेवारीस ठरल्या प्रमाणे सकाळी  ८ वाजता  पाटणे  ज्येष्ठ नागरिक मंडळाचे १३ सदस्य नियोजित  क्रुझर बस ने  सहलीला  निघाले. 

                                  बस नामपुर  येताच थांबली .  चालक  -मालक श्री   अमोल  आहिरे यांनी काही खरेदी करावयाची   असल्यास  येथे करून घ्या. कारण पुढील प्रदेश डोंगराळ आणि ग्रामीण आहे , मोठे गाव पुढे नाही .  मग सर्वानी श्रीफळ ,हार, गुच्छ घेतले  व गाडी  पुढे धावू लागली , नामपूर बागलाण तालुक्यातील चांगली बाजारपेठ . येथील  कै .जयवंत सावंत बागलाण च नव्हे तर मालेगाव तालुक्यातील सुद्धा नावारूपास आलेले व्यक्तिमत्व .  नामपूर  इतिहास ,भूगोल शिवाय त्याच्या  अपूर्णच . नामपूर मोक्षगंगेच्या उजव्या तीरावर ,  बागलाण आणि खान्देश या दोन्ही भावंडांना सांभाळणारे ते नामपूरच . मोसमचे खोरे व  धनदायी , चिराइ , म्हाळसाई , नागाई , ,धनाई ,पुनाई  या भगिनीं  चे  प्रवेशद्वार  नामपूर च . 

                             नामपूर सोडताच मोसम चा पूल  ही  गेला.  साक्री  रोड ही  मागे पडला , आता  दुतर्फ़ा  बागा डाळिंबाच्या ,द्राक्षांच्या  ,या शिवाय उसाचे  मळे   आणि  शेतक-यांना  रडविणारा - हसविणारा  कांदा मात्र बेसुमार क्षेत्र  अंगा खाली घेत होता . पहिले गाव आले खामलोन . प्रगतीशील व संपन्न गाव

खामलोन गेले  तरी कांदे लागवड संपता- संपेना  साहजिकच मनात विचारांची शृंखला  सुरु झाली.  कसे होणार ? शेतकरी बांधवांचे ? एवढी कांदे लागवड !येणारे बम्पर उत्पन्न  ? कांदा    म्हणजे जेवण नव्हे . फक्त तोंडी लावण्या पुरते . मागणी नसली कि भाव पडतात . भाव पडले कि लागवड खर्च वसूल  होत नाही . कर्जे फिटत नाहीत.  कर्जाचे तगादे सुरु होतात . सावकार व बँका  घरातली भांडी काढणार , अब्रू चव्हाट्यावर येणार शेतकरी आत्महत्त्या करणार.कसे होणार बाली राजाचे ?मनातील  प्रश्नांची मालिका अखंडित होईच  ना. उत्राणे  गाव  आले आणि गेले तरी थांगपत्ता  नाही लागला .. 

                  पण  तो वर गाडी  थांबलेली .उतरा! उतरा !  ! आणि  अर्ध्या तासापासून बसलेले पण थकलेले खाली उतरले. हात पाय झाडून मोकळे झाले. परिसर न्याहाळू लागले .सुंदर ! फारच छान ! मंदिर परिसर  स्वच्छ ,प्रेक्षणीय तर होताच परंतु सर्वसोयीयुक्त सुध्दा वाटला.परिसर पहाता पहाता मंदिराकडे जाऊन दर्शन घेऊ या ! म्हणून दर्शन घेतले.

                    दर्शांन घेऊन  सारे बाहेर आले. आता उपाध्यक्ष श्री भिला सोनू  खैरनार याचा ८७ वा वाढदिवस साजरा करणेसाठी सर्व बसले . अध्यक्ष यांनी प्रास्ताविक करून हार,श्रीफळ ,उपरणे ,टोपी व स्वेटर देऊन सत्कार केला.शुभेच्छा दिल्या. आळीपाळीने सर्वानी सत्कार करून शुभेच्छा दिल्या.सौ. जयश्री आहिरे यांनी त्यांच्या जीवनावर माहिती विशद केली . शेवटी कोंडाजी बागूल यांनी आभार मानले . नंतर जेवणे करून आम्ही पुढे जानेसाठी बाहेर पडलो .

                             पुढे दोन तीन किलोमीटर वर टिंगरी म्हणून खेडेगाव लागले.रस्ताअरुंद पण डांबरी.वाहतूक  निरक .डोंगराळ प्रदेश .हिडबरी घाट असल्याचे कळले. आता आम्ही धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातून जात आहोत.घाटाच्या पायथ्याशी हिडीमबा देवीचे मंदिर दिसले .

    साक्री तालुक्यातील श्री गोपाल कृष्ण मंदिर साठी प्रसिद्ध असलेले प्रतापपुर हे प्रगत गाव लागले. गावात प्रवेश करताच स्टँड जवळ मंदिर असलेने सर्वानी कळत न कळत दर्शन घेतले . मंदिराचे प्रवेश दारातच नामफलक दृष्टीस पडतो. मंदिराची लोकप्रियता ,मान्यता समजते .

            या नंतर मात्र उभन्द्री ,शेवडीपाडा मार्गे पिंपळनेर-सटाणा महामार्ग पावदेव फाटा येथे येऊन कातरवेळ वरून जैन मंदिर मांगी--तुंगी गाठले.पर्वतारोहन टाळले व सटाणा मार्गे घरी येऊन सहली ची सांगता झाली .

         

 

मंगळवार, २९ नोव्हेंबर, २०२२

वैतरणा सहल पाटणे ज्येष्ठ नागरिक मित्र मंडळ .  दिनांक -- १३ नोव्हेम्बर २०२२. रविवार  .

वैतरणा  सहल पाटणे  ज्येष्ठ नागरिक मित्र मंडळ     दिनांक -- १३ नोव्हेम्बर २०२२. रविवार 
                            अध्यक्ष = श्री . बी. के. अहिरे .  पाटणे . 
                          ---------------------------------------------------------------------------------. 
                            कॊरॊनाने  काढता पाय घेताच सर्वच क्षेत्रात हालचाली सुरु झाल्यात .  मग पाटणे  ज्येष्ठ नागरिक मित्र मंडळी तरी मागे का राहावी . रोज सकाळी कट्ट्यावर येणारे सभासद गप्पा-टप्पा करताना बऱ्याच दिवसात आपण कोठे बाहेर पडलो नाहीत , कंटाळा आला आहे घरात बसून नेहमीची उष्टी- खरकटी काढून जीव मेटाकुटीला आला आहे . वगैरे -वगैरे म्हणायचे . मतितार्थ  बाहेर पडायला  हवे . आणि शेवटी सर्वानी एक दिवसीय सहल , सर्वाना सहज परवडेल अशी व सूर्यास्त होईस्तोवर घरी परतता येईल  अशी  म्हणून वैतरणा . दारणा धरण  व्हाया  त्र्यम्बकेश्वर  जावयाचे  निश्चित  झाले. 
                                                                                                                                                                                               दिनांक १३ नोव्हेंबर २०२२  रविवारी क्रेझरने जावयाचे  ठरले .सकाळी ६  वाजता सर्व सभासदांनी नेहमीच्या कट्ट्यावर जमावे . जेवणाचे डब्बे ;पाणी ; औषधे  घ्यावीत . असे ठरले ,  एकदाचा रविवार उजाडला .  त्या दिवशी नेमके सहल प्रमुख  श्री. मोतीलाल बागुल व त्याच्या  श्रीमती  अचानक एका जवळच्या  नातेवाईकाचे निधन झाल्याने  येऊ शकले नाही .    तरी  ही ५   महिला व ५ पुरुष असे एकूण १० सभासद मित्र  सहलीत सहभागी  झाले . बरोबर ६. ५ वाजता  आम्ही पाटणे  सोडले .  चांदवड ;म्हसरूळ ;नाशिक मार्गे ९ वाजता    त्रयंबकेश्वर  गाठले. रविवार असल्याने यात्रेकरूंची  तुफान गर्दी दिसत होती  आम्ही सारे ८०+ असल्याने गर्दीत जाऊन दर्शन घेणे अवघड. शेवटी कळस दर्शन घेऊन आम्ही बाहेर म्हणजे वैतरणा  मार्ग धरला . 
                                 गावाबाहेर पडताच  दुतर्फा पर्वत  रांगा ;मधून    भात  शेती  दिसू लागली.  चौफेर पसरलेल्या सह्याद्रीच्या हिरव्यागार वृक्षराजी ; गगनचुंबी शिखरे . नुकताच पावसाळा संपलेला .त्यामुळे शेतकरी हंगामाची आवराआवर करीत होता. गुरांसाठी वर्षभर पुरेल असा चारा गोळा करून  त्याची साठवण करीत होता . तर गुराखी शेळ्या  मेंढ्याचे कळप चारण्यासाठी बाहेर पडत होता . सकाळ असल्याने तशी सर्वत्र शांतताच दिसून येत होती . पाण्याची तळी ; डबकी छोटेमोठे तलाव ;खळखळणारे झरे   पाहता पाहताच नजर पुरणार नाही असा जलसागर दिसू लागला. तितक्यात कोणी तरी साद घातली वैतरणा आले . अन ते वैतारणाचं होते . 
                            भारत स्वतंत्र होण्यापूर्वी भविष्यवेधी ब्रिटीशानी मुबईची  तहान भागविण्यासाठी व मुंबईला  वीज  पुरवठा  व्हावा म्हणून  वैतरणा धरण बांधले   .  धरणाचे स्वरूप ; आकारमान  विस्तीर्ण आणि अनेक टेकड्या मधून  असल्याने इतर धरणा सारखे  एका दृष्टीक्षेपात  दिसून येत नाही  . नैसर्गिक रचनेमुळे सारे काही विलोभनीय झाले आहे . दूरवर पसरलेले पाणी सागरच. लाटांचा कानावर पडलेला आवाज  एक मोहिनी घालतो असे वाटते . 
                      इतक्यात सुरक्षित जागा पाहून गाडी चालकाने  थांबा घेतला .  पाच तासाचा प्रवासाने सर्वाची गात्रे कुरकुरत होती. लगबगीने सारे खाली उतरले. आळोखे पिळोखे देऊन  थकवा झटकू लागले . काही मंडळी मोकळे व्हावे  म्हणून आडोसे शोधू लागली .  सारा  आसमंत  सर्वत्र पसरलेली निळाई . मन आणि डोळे तृप्त . फोटो सेशन  झाले सुरु . महिलांचे ग्रुप फोटो ;पुरुषांचे ग्रुप फोटो ; धरणाचे फोटो  ;पक्षाचे फोटो  सेल्फी फोटो.  मनसोक्त फोटो काढून झालेवर लगेच  फोटो फरवर्डिंग . एकदाचा खेळ संपला . गाडीचा हॉर्न वाजला ; चलो रे चलो  . 

                        आता गाडीने रस्ता  धरला दारणा धरणा चा . घोटी व राष्ट्रीय महामार्ग  . परिसरात तांदूळ  ची शेती ; कारखाने तांदुळा चे .. पुढे मात्र रस्ता  खड्ड्याचा ; धुळी चा  अन कारखान्याचे  धुराचा . पाच -दहा मिनिटात सारे निवळले . पुन्हा दारणा ची निळाई दिसू लागली . 
                            वैतरणा परिसरापेक्षा  दारणा परिक्षेत्र सुधारित  भातशेती ; नागरी वस्ती.  दुकाने ;रेखीव घरे ; बंगले; कारखाने यांची रेलचेल  असलेले  दिसत होते .पुरुष मंडळी यावर चर्चा करीत असताना महिला मात्र घर व एकमेकांची उणीदुणी  यातच  गुंतलेल्या दिसत होत्या . घोटी ते सिन्नर मार्ग  उसाचे   मळे  ; भातशेतीची खाचरे ; भाजीपाला  यांनी समृद्द .  आजू बाजूचे कालवे व बागाईत शेती पाहून दारणा ची चाहूल  लागली ..  समोर धरणच दिसू लागले .  हे धारण  हि ब्रटिशांची च  देणगी . धारण प्रेक्षणीय आहे पण आपल्या शासनाचे  दुर्लक्ष्य  पावलो पावली जाणवत होते . परिसर बेबंद झाडी ; चिखल ; कचरा  यांनी बरबटलेला . सारे निराश झाले . शेवटी एक हॉटेल पाहून बरोबर आणलेले डबे जवळ केले ; काही मंडळीने मात्र  कटरा  माशांची ऑर्डर दिली   
                      सर्वांची वामकुक्षी होताच  आवरा आवर सुरु झाली . हॉटेल चे बिल देऊन झाले . हॉटेल मालक खूप चांगले होते. त्यांनी सर्वाना शुभेच्छा दिल्या . आम्ही हि त्याचे  आभार मानले व निरोप घेतला. 
                       आम्ही  बरोबर चार वाजता घरी म्हणजे पाटणे  येथे परतलो . सर्वानी एकमेकांना शुभेच्या  देऊन पुन्हा भेटूया  असे म्हणून निरोप घेतला 
                             


               

 




शुक्रवार, २२ एप्रिल, २०२२

माझा गाव पाटणे

प्रास्तविक - 

एक खेडेगाव . नाशिक जिल्हा तालुका मालेगाव . राष्ट्रीय महामार्ग तीन च्या पश्चिमेस दीड मीटर अंतरावर . उत्तर अक्षांश २०. ५३ ; पूर्व रेखांश ७४. ४४ . पिवोड - ४२३२०१ . पूर्वेस   टेहरे ; मालेगाव कौळाणे. पश्चिमेस लहान आघार ;दक्षिणेस मुंगसे आणि उत्तरेस दाभाडी बारा बलुतेदार व अठरा पगड जाती . फुल माळी समाजाचे प्राबल्य ..मराठा ;  कोळी ; साळी ;धोबी ; भिल; हरिजन.; मातंग ;वडार सुतार; लोहार ; ब्राम्हण ;तेली ;न्हावी ;बेलदार ;कुणबी ;कोकणी ; राजपूत ; मारवाडी ;कासार ;गोसावी ; शिंपी ; गोंधळी ;रंगारी ; सर्व समाज गुण्या गोविंदाने राहतात 

      मालेगाव तालुक्यातील मातब्बर गावांपैकी एक .यास बंगाली पाटणे असे ही म्हणतात .झाडू माळ्याचे पाटणे  अशी ही ओळख . झाडू माळी व बाळू माळी गुराखी मित्र . साऱ्या गावातील गाई ,म्हशी गावाच्या पूर्वेस गणपती मंदिर समोर एकत्र व्हायच्या. त्यांना दुपार पर्यंत चारून दुपारी विश्रांती साठी पाटावर घेऊन येत . गुरे विश्रांती घेत व दोघे मित्र आपल्या भाकरी खात असत .एके दिवशी असेच जेवण करीत असताना   डोंबारीची पाल तेथे उतरली.त्यांची घोडी,कोंबड्या ,काही शेळ्या , बाई मानस , पोर ,पोरी आणि खेळाचे साहित्य दिसत होते, बहुधा उद्या ते गावात खेळ करणार हे नक्की .

 आणि पुढचे दोन दिवस त्यांनी कसरतीचे खेळ गांधी चौकात ,पटांगण गल्लीत,आणि कोंबड गल्लीत केलेत आणि शेवटी जादूचे खेळ गावातील मांत्रिक ,जादूगार याना आवाहन देऊन केले. सारे गावकरी मंत्रमुग्ध झालेत."दोन-चार दिवस सारे ग्रामस्थ मिटक्या मारीत त्याच गोष्टी  चघळत राहिले .त्या नंतर च्या दुसऱ्या दिवशी रान फिरवून दुपारी पाणवठ्यावर जेव्हा दोघे मित्र आले तर  सूनसुनाट .डोंबारी  परागंदा . भाकरी सोडून जेवायला बसणार इतक्यात आवाज ,दोन घास माला भी दया. असा आवाज आला.झाडू व बाळू जवळ गेले  जेवण दिले,त्याच आजीने त्यांना स्वतःच्या मुलांना न दिलेली विद्या देऊन कसे  पारंगत केले , वगैरे कथा सांगतात.मांत्रिक,जादूगर,आज ही त्यांना नमन करून च कार्यक्रम करतात . आज शिवेवर उभारलेल्या स्वागत कमानीवर ग्रामदैवत म्हणून त्यांचे नाव टाकून ग्राम पंचायतिने आदर व्यक्त केला आहे.

                 स्वातंत्र्य संग्रामात कै .कौतिक गंगाराम पगारे,माधवराव वाघ.कृष्णाजी पेठे,पंडित चिमन ,प्रल्हाद भिकाजी यांनी सहभाग घेऊन आपली नांवे कायमची कोरून ठेवली .दुसऱ्या जागतिक युद्धात काही जवानांनी  ब्रिटिश शासनास मदत केली .पाटणे गावांत सन १९५२-१९५३ मध्ये ग्राम पंचायत आली.शेतकरी बांधवा साठी सहकारी सोसायटी   आली.कै. लक्ष्मण दशरथ आहिरे २७ वर्ष चेअरमन म्हणून राहिले.

     

    

   

 

 

गुरुवार, २१ एप्रिल, २०२२

केदारनाथ -बद्रिनाथ यात्रा

       केदारनाथ -बद्रिनाथ  यात्रा                                                                       दिनांक -२०/०५/२०००. 
                            जवळ जवळ १२ महिन्या पासून केदारनाथ -बद्रिनाथ यात्रा करण्याचा संकल्प सोडलेला होता.  तो आज दिनांक २०./०५/२०००रोजी सिद्धिस जात आहे. अस्मादिक ;कुटुंब ;दोन्ही जावाई ;दोन्ही मुली व ७ नातू यांसाठी  १  ट्रक्स व रामचंद्र बापू ;कुटुंबिय व मित्र परिवारासाठी एक मार्शल अशा दोन गाड्यांनी दिनांक २१/०५/२००० रोजी पहाटे देवाचे नाव घेऊन आम्ही केदारनाथ =बद्रीनाथ यात्रे करिता कूच केले.  अशी झाली आमची यात्रा सुरू . 
                       हिमालयाच्या  पर्वत रांगा ;त्याची गगनचुंबी शिखरे ;गंगा ;यमुना  सारख्या बारमाही वहाणा-या  नद्या ;चंबळेचे खोरे ;इंद्रप्रस्थ ;इंदोर ;भोपाळ ;मथुरा ;वृंदावन सारखी अशी कितीतरी  भौगोलिक  व ऐतिहासिक आणि पौराणिक  सुध्दा शहरे आपण पहाणार या भावनेने मन मोहरून गेले होते तर दुर्गम पहाडी प्रदेश; राजमार्गावर होणारे अपघात;कोसळणारे कडे;ठप्प होणारी वहातूक; प्रवाशांची होणारी कोंडी द-यात कोसळणा-या प्रवासी गाड्या  आणि आपण तर सारे कुटुंबच घेऊन निघालो . त्यातून मनाला हुलकावणारी भीती त्यातून अंतकरणात होणारी घालमेल;मनाला वेदना देऊन जात होती . पण कोठेतरी स्वामी समर्थांचे वाक्ये भिऊ नकोस मी तुझ्या पाठीसी आहे प्रवासाला धिट व निर्भय बनवीत होते. पहिल्याच दिवसी प्रत्येकाला वाटणारी हुरहूर ;गप्पा-गाणी ;प्रवास ;घर प्रपंच ;याच्या चिंता यातच आमचा प्रवास सुरु झाला. मालेगाव गेले; धुळे गेले व शिरपूर ही गेले आणि महाराष्ट्राला बाय बाय केले. आपले राज्य गेले  मध्य प्रदेश भारताच्या नकाशा वरील सर्वात मोठा भूभाग व्यापणारे राज्य क्षिप्रा ; चंबळा;नर्मदा;तापी ;सारख्या नद्द्याची खोरी .इन्दोर ;उज्जैन मांडवगड;महू ;भोपाळ  कितीतरी अशी शहरे व नगरे यांच्या सीमा  आपण स्पर्शून जाणार ही कल्पनाच मनाला रोमाचिंत करीत होती . इतक्यात बिजासनी देवीचे मंदिर आले. धनवटांची ही कुलदेवी  श्रीफळ चढउन देवीचे दर्शन घेतले . 
                             त्या नंतर आले सेंधवा .नर्मदा आली व धामनोर येथे आम्ही चहापान घेतला.धामनोरहून महूला पोहचलो .महू म्हणजे भारतीय घटनेचे शिल्पकार बाबासाहेब  आंबेडकर यांचे जन्म स्थळ  विशेष  म्हणजे राष्टीय  राज मार्ग -३ महू गावातून तर जातोच आणि तो ही बाबासाहेबांच्या जन्म स्थळाला स्पर्श करूनच . जणू त्याना वंदन करूनच.  त्या महा मानवाला आम्ही ही प्रणाम केला. 
                         दुपारी २ पर्येंत आम्ही इंदोर ला पोहचलो.   इतक्यात मार्शलला ट्राफिक  पोलिसांनी घेरलेले.  कशी तरी तोडी करून आम्ही पुढचा  रस्ता धरला. पुढे आले देवास . नंतर जैताबाद; शाजापूर; सारंगपूर करीत रात्री ९. ३० वाजता ब्यावरा ह्या तहसिल ला पोहचलो. तेथील मेडतवाल धर्मशाळेत मुक्काम केला . धर्मशाळा सर्व  सुख सोयीने युक्त होती . रात्री जेवणे करून दिवसभराच्या थकव्याने सारे झोपेच्या स्वाधीन झाले. 
                                    आज २२  मे २०००;प्रात:काळी सर्व जागे झाले व आपआपल्या परीने तयारीला लागले . .चहा;नाश्ता घेऊन ८ वाजता आम्ही ब्यावरा सोडले. पुढे  बिनागंज ;आवन ;विजयापूर.सठियाई;गुणा ;बदखाघक़ालीरस  व शेवटी शिवपुरी येथे दुपारी २ वाजता पोहचलो. उष्मा  मी म्हणत होता. गुणा आणि शिवपुरी म्हणजे दस्युरानी पुतळा हिच्या कुप्रसिद्द लिलांनी ओळखला जाणारा प्रदेश . हजारो किलो मिटर पसरलेली घनदाट जंगले ;भिल्लाची साम्राज्ये ;हे सारे आठउन  अंगावर भीतीचा काटा उभा राही.  शिवपुरीला जेवण घेऊन सांयकाळ पर्यत ग्वाल्हेर गाठणे हेच बरे म्हणूं लवकर निघालो. आता जंगल प्रवास सुरू झाला . पण जसे ऐकले  होते तसे काही ही आढळले  नाही. दुतर्फा बरीच   जंगल तोड झालेली . २५ ते ५० किलोमीटरच्या अंतरावर  ढाबे  सजलेली त्यामुळे आता दिवसाच काय पण रात्री सुद्दा बिनधास्त प्रवास करता येईल इतक्या सुधारणा झालेल्या . दरोडेखोरांचा जवळ जवळ निपात झालेला. बरीचशी जमीन शेतीखाली आलेली. व्यापार ही वृद्धिंगत झालेला . फरसीच्या  खाणीच खाणी. जिकडे पहावे तिकडे जणू फरसिचीच. शेती की काय.शेती मात्र मागासलेली. उघडया विहिरी नाहीत. बॉरिंगच्या  विहिरी मात्र अंतरा अंतरावर दिसत होत्या. उत्तर भारताकडे जसे वर वर जावे तसा तसे उष्णतामान मात्र वाढत जाते. उष्माघातामुळे माणसे मेल्याच्या बातम्या ज्या आपण  वर्तमानपत्रातून वाचत होतो त्याची प्रचिती जानवते. अधून मधून जनावरे मरून  पडलेली  दिसत होती. ती उश्माघातामुळेच . 
                                        सांयकाळी ४ वाजता अम्ही एकदाचे ग्वाल्हेर गाठले  तेथे वेळ न दवडता प्रवास चालूच  ठेवला .मुरैना येथे मध्य प्रदेश ची सरहद्द संपली.आता राजस्थान सीमा आमचे           स्वागत करीत होती. एका राज्यातून दुस-या राज्यात प्रवेश करताना मनाला एक अनामिक जाणिव होते.आपल्या प्रदेशां पासून         जसजसे आपण दुरावतो तसतसे ही अनामिक जाणिव भीति ;हुरहूर व रोमांच भावनांनी मनाला व्यापून टाकते. आता आग्रा आले होते. एका धर्मशाळेत मुक्काम. प्रेमनगरी   आग्रा .      ताजमहाल शहाजन्हा व मुमताज याच्या प्रेमाचे अप्रतिम प्रतिक. जग  प्रसिद्द ताजमहल च्या प्रांगनात आपण    पहुडलो    आहोत ही     भावना  मनाला गद्गगदित होती. दुस-या बाजूला यमुनेचे ते गलिच्छ पात्र; प्रवाशांना लुबाडणारे शहर हेच का ते आग्रा ?  आज      सकाळी ६ वाजता आवराआवर करून ताजमहाल पहाण्यासाठी आम्ही बाहेर पडलो. प्रवेश द्वारात अनेक देशी विदेशी तो स्वर्गतुल्य ताज पहाण्यासाठी  उत्सुक होते . तिकीटे काढून रांगा लावित होते . एकदाचा आम्ही ताजच्या त्या विस्तीर्ण प्रांगणात प्रवेश केला . भव्य व दिव्य ताजचे ते विलोभिनिय रूप पाहून मोगलाचा सारा इतिहास  तरूळून गेला  थुई थुई नाचणारी कारंजी . आकाशाला भिडणारे मिनार आणि ताजला स्पर्शून जाणारी यमुना सारे मंत्रमुग्ध  करणारेच अंत करणात  आणि डोळ्यात कसे साठवणार फोटो च फोटो . शरीर व मन ही  थकले  पण पाउले काही बाहेर पडे नात . प्रेमी जगताला भूषनावह ;गरिबांना असूया उत्पन्न करणारा  व कवी मनाला भुरळ पाडणा-या वास्तूतून अखेर आम्ही बाहेर पडलों आता आम्ही आग्रा किल्ल्याकडे मोर्चा वळविला. मोगलांच्या विशाल साम्राज्याची व कठोर शिस्तीची कल्पना आग्रा किल्याचे विशाल प्रवेश दार पाहून येते. आग्रा किल्याचा बराचसा भाग संरक्षण खात्याच्या अधिपत्या खाली असल्याने पुर्ण किल्ला काही पहाता  येत नाही . किल्ल्याचे ते विशाल स्वरूप पाहून शिवबांनी आग-याहून  कशी सुटका करून घेतली असेल ? असे प्रश्न तर येतातच परंतु शिवबाची मर्दुमुखी व शौर्य ही आपल्या मनाला मोहरून टाकते . उगीचच नाही मोगलांना पळता भुई थोडी झाली होती. दुपारी १ वाजता आम्ही आग्रा सोडले व मथुरेकडे प्रयाण केले. तीन वाजता आम्ही कंसाच्या नगरीत प्रवेश केला  मथुरा म्हणताच वासुदेव देवकी ; उग्रसेन; कृष्णाचे जन्म स्थळ अशा कितीतरी कथा डोळ्यासमोरून तरळून जाऊ लागल्या.  त्या नंतर आम्ही गोकुळात गेलो. येथे अजुनही गाईचे संवर्धन होते. दुध व दही विपुल प्रमाणात उपलब्ध होते.  त्याचा येथेच्छ  स्वाद घेऊन आम्ही वृदां वनात आलो. वृदांवनात रासलीला व इतर पौराणिक कथांना अनुरूप अनेक ठिकाणे पहावयास मिळतात. येथील श्रीकृष्णाचे मंदिर अप्रतिम आहे. आता आम्ही दिल्ली कडे निघालों रात्री १० वाजता आम्ही दिल्लीला पोहचलो. आमची गाडी इतिहास प्रसिद्द लाल किल्ल्यासमोर उभी होती . दिल्ली हळू हळू निद्राधीन होत होती. लाल किल्ल्या समोरील त्या विस्तीर्ण मैदानात सर्वत्र टुरिस्ट गाड्यांच उभ्या होत्या निवासाची सोय होणे शक्य नाही हे आमच्या लक्षात आले आम्ही पुढे चालत रहाण्याचा निर्णय घेतला रात्री ११ वाजता आम्ही दिल्लीला बाय बाय केले. पुढे गाझियाबाद जवळ आल्यावर रस्त्याच्या कडेला ब-याचशा टुरिस्ट गाड्या पाहून आम्ही ही तेथेच रात्र काढावयाचा निर्णय घेतला. एव्हाना चालक जेवणा साठी बाहेर पडलेले तर इतर बिछाने टाकून झोपावयास गेलेले. डासांचा उच्छाद असून  ही दिवस भराच्या शिनवट्याने आक़्मचे डोळे आपोआप बंद झाले. शेवटी २४ मे उजाडला. सर्व खडबडून जागे झाले . प्रातविधी आटोपून सर्व प्रवासास सिध्द  झाले. गाझियाबादला चहा घेतला. पुढे मोतीनगर;मोदीपुरम ;सकोती;मुझ्झपरनगर ;रूडकी;वहादराबाद मार्गे हरद्वार कडे आम्ही जात राहिलो. हरद्वार ५० किलोमीटरवर असेल तितक्यात एका विहिरीवरील बोरींग चे पाणी पाहून सर्वानी स्नानाची तयारी केली . मार्शल मात्र पुढे निघून गेली .       गाझियाबाद हून